कोपरगाव शहरालगत कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक

एक ठार तर दोन जखमी
कोपरगाव शहरालगत कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरालगत असलेल्या येसगाव खिर्डीगणेश शिवारालगत भास्कर वस्ती जवळ रविवारी दुपारी कोपरगावहुन येवल्याच्या दिशेने जाणारा कंटेनर (क्रमांक एच.पी. 72 डी 3136) व येवल्याहून कोपरगावकडे येणारा आयशर ट्रक (एम.पी. 09 जी ई 6274) यांची समोरासमोर धडक झाली. यात एम.पी 09 जी ई 6274 या वाहनातील चालक ठार झाला असून कंटेनर एच. पी. 72 डी 3136 मधील अशोकसिंग राजपूत व भागसिंग सोहता हे दोघेही जखमी झाले आहे.

जखमीना उपचारकरिता दवाखान्यात हलविले असून मयताचा मृतदेह शवविच्छेदाना करिता ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. सदर अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मदत करून जखमिंना उपचारकरिता रुग्णालय हलविले. यावेळी वाहतूक जाम झाल्याने तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरळीत केली. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com