कंटेनरला धडकल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

कंटेनरला धडकल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

कंटेनर वर मागून धडकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील डोळासणे शिवारात पुलावर घडली.

मोटारसायकल क्रमांक एम. एच .01 ए. डब्ल्यू. 6651 वरील मोटरसायकल चालक दीपक शिवाजी डोके (रा. बोटा) हा महामार्गावर भरधाव वेगाने जात होता. त्याने डोळासणे परिसरात ट्रक कंटेनर क्रमांक एम. एच. 14 जी. डी. 2709 याला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दीपक डोके यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर डोळासणे येथील पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजुला करुन वाहतूक सुरळीत केली. सदर ट्रक वरील चालक सुनिल मारुती पवार (रा. डोळासणे) यास घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com