कांदा घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला कंटेनरची धडक, ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळील घटना
कांदा घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला कंटेनरची धडक, ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोकमठाणहून कोपरगावच्या दिशेने कांदा घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीला कंटेनरने जोराची धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर चालक तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तरुण शेतकरी शंकर खंडेराव लोहकने (वय 30) राहणार कोकमठाण हे शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर मध्ये कांदा भरून कोपरगावच्या दिशेने निघाले असता संत जनार्दन स्वामी आश्रम जवळ पोहोचले. तेव्हा मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर क्रमांक ठग06 ॠउ4621 याने ट्रॅक्टर क्रमांक चक 15 ऊण 11 10 याला मागून जोराची धडक दिली.

धडक इतकी जोराची होती की कांद्याने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याच्या कडेला काटवनात जाऊन पलटी झाली. या अपघातात ट्रॅक्टर चालक शंकर लोहकने गंभीर जखमी झाल्याने त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरांनी शंकरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे.

या प्रकरणी मयताचा चुलतभाऊ गोकुळ आप्पासाहेब लोहकणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कंटेनरच्या चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 217/ 21 भारतीय दंडविधान कलम 304 (अ)279 338 427 मोटार वाहन कायदा कलम 184 134/177 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com