कंटेनरवर कार धडकली; दोन ठार, तिघे गंभीर जखमी

जखमींमध्ये 6 वर्षीय बालिकेचाही समावेश
कंटेनरवर कार धडकली; दोन ठार, तिघे गंभीर जखमी

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

नेवासा फाटा (Newasa Phata) येथे कार व कंटेनरच्या झालेल्या अपघातात (Container Accident) दोन जण जागीच ठार (Death) तर तीन जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. जळगाव जिल्ह्यातील (Jalgav District) रावेर (Ravel) येथून निघालेली ही कार औरंगाबादहून (Aurangabad) नगरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.

याबाबत माहिती अशी की पुणे (Pune) येथे नातेवाईकांच्या सत्यनारायण महापुजेच्या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील (Jalgav District) रावेर येथून काही लोक कारमधून औरंगाबादहून नगरकडे जात होते. नेवासा फाटा (Newasa Phata) येथील आंबेडकर चौकानजिक श्वास हॉस्पीटलसमोर शनिवारी मध्यरात्री त्यांच्या मारुती विको कारने (एमएच 19 सीव्ही 7130) कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात कारमधील (Accident Car) गजेंद्र रुपचंद कोलते (वय 65, रा. वाघोदे, ता.रावेर), अकाश प्रकाश सांगेले (वय 28 रा.थोरगव्हाण, ता.रावेर) हे दोघे जागीच ठार (Death) झाले तर कल्पेश विनोदचंद पाटील (वय 35) रा. वलसाड (गुजरात), सुलभा गजेंद्र कोलते (वय 55) व भुमिका कल्पेश पाटील (वय 6 वर्षे) हे तिघे या अपघातात गंभीर जखमी झाले. जखमी तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजक असल्याची माहीती श्वास हॉस्पिटचे प्रमुख डॉ. अविनाश काळे यांनी दिली.

नगर -औरंगाबाद महामार्गावरील (Nagar-Aurangabad Highway) रस्त्यावर गतिरोधक नुकतेच बसविण्यात आलेले असून गतीरोधकांचा अंदाज चालकांना येत नसल्यामुळे अचानक लावलेल्या ब्रेकमुळे पाठीमागून येणारे वाहन समोरच्या वाहनांना भिडून याठिकाणी अपघात घडताना दिसून येत आहेत. कंटेनर चालकाने अपघातानंतर धुम ठोकली असून फरार झालेल्या कंटेनरचा शोध नेवासा पोलीस (Newasa Police) घेत आहेत. अपघाताचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

गतिरोधक बसविलेल्या ठिकाणी पांढर्‍या रंगाचे पट्टे मारून सुरक्षिततेसाठी रेड सिग्नल बसविण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

- बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक, नेवासा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com