टायर फुटल्याने कंटेनर थेट दुकानात घुसला; कुठे घडली घटना?

एक जखमी
टायर फुटल्याने कंटेनर थेट दुकानात घुसला; कुठे घडली घटना?

करंजी |वार्ताहार| Karanji

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव (Tisgav) येथील वृद्धेश्वर चौकात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेवगावकडून नगरकडे (Shevgav Ahmednagar) जात असलेला एका कंटेनरचा (Container) टायर फुटल्याने चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले व त्यानंतर हा कंटेनर (Container) सरळ एका दुकानाकडे घुसला.

टायर फुटल्याने कंटेनर थेट दुकानात घुसला; कुठे घडली घटना?
घुले-गडाखांच्या राजकीय प्रभावाचा विस्तार

या घटनेमुळे दुकानाजवळ उभे असलेले मच्छिंद्र पाथरे (रा.तिसगाव) हे किरकोळ जखमी (Injured) झाले आहेत. टायर फुटल्यानंतर कंटेनर (Container) दुकानाच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच दिलीप जनरल स्टोअर या दुकानाजवळील ग्राहक सैरावैरा पळू लागले. यामध्ये काही मोटरसायकलीचे देखील किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.

टायर फुटल्याने कंटेनर थेट दुकानात घुसला; कुठे घडली घटना?
देवळालीच्या व्यापार्‍याला तीन लाखांना गंडा

टायर फुटल्याने मोठा आवाज झाला व कंटेनर (Container) दुकानाकडे घुसल्याचे लोकांच्या लक्षात येताच बघ्यांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली. यावेळी कंटेनर (Container) चालकाला तिसगावच्या तरुणांनी खाली उतरून घेत कोणी मारहाण (Beating) करू नये म्हणून त्याला सुरक्षित ठिकाणी हलवले. तिसगाव (Tisgav) येथील वृद्धेश्वर चौक ते शेवगाव रोडपर्यंत (Shevgav) रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर मोटरसायकलीसह इतर वाहने मोठ्या प्रमाणात लावलेली असतात ती देखील वाहतूक कोंडीला कारण ठरतात.

टायर फुटल्याने कंटेनर थेट दुकानात घुसला; कुठे घडली घटना?
नगर अर्बनच्या पैशांतून खरेदी केलेली जमीन रडारवर

गुरुवारी आठवडे बाजारच्या दिवशी तर भाजी विक्री ते थेट महामार्गावरच भाजी विक्रीसाठी बसत असल्यामुळे या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. मंगळवारी सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी कंटेनर (Container) दुकानात घुसल्याने मोठा गोंधळ उडाला.

टायर फुटल्याने कंटेनर थेट दुकानात घुसला; कुठे घडली घटना?
मद्यप्राशन करून युवकाचा हॉटेलमध्ये राडा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com