पाच बांधकाम कामगारांवर हल्ला

पाच बांधकाम कामगारांवर हल्ला

जामखेड/कर्जत |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेडच्या नवीन एसटी बस स्थानकाच्या बांधकामत बसून येथे दारु पिऊ नका असे सांगितल्याचा राग आल्याने जामखेडच्या पाच जणांनी बांधकामावर काम करत असलेल्या बांधकाम कामगारांवर कोयता, लोखंडी रॉड व कुर्‍हाडीने हल्ला केला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश काळे, रा.जामखेड, चंद्रकांत काळे, शिवाजी काळे, राणा काळे, किरण काळे, (रा. भूतवाडा रोड, जामखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी, काही महिन्यांपासून शहरात नविन बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी परगावाहून काही कामगार काम करण्यासाठी आले आहेत. 5 जानेवारीला रात्री या बांधकाम सुरू असलेल्या बसस्थानकाच्या हॉलमध्ये तीन जण दारु पित बसले होते.

यावेळी त्यांना या ठिकाणी असलेल्या योगेश भोरकडे यांनी सांगितले, या येथे दारु पिऊ नका,असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यावर त्यांनी फोन करून आणखी दोघांना बोलवले व या पाच जणांनी या ठिकाणी लावण्यात आलेल्या लाईट फोडून बांधकाम कामगार योगेश भोरकडे, बलीराम कोल, राधेश्याम विश्वकर्मा, शरद सुपेकर व आकाश शिंदे या पाच जणांवर लोखंडी रॉड, कोयता व कुर्‍हाडीने मारहाण करत जखमी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com