बांधकाम करताना पडून मजुराचा मृत्यू

बांधकाम करताना पडून मजुराचा मृत्यू

शिर्डी (प्रतिनिधी) -

शिर्डी शहरात महाराष्ट्र शासनाच्या पोलीस वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास 26 कोटी रुपये खर्च करून आफीस व पोलीस निवासस्थान

अशा जवळपास 7 मजली इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असुन बिगारी काम करणारा शामलाल धरमलाल बिजेवार (वय 42) रा. बालाघाट मध्यप्रदेश यांचा काम करताना पडुन जबर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

या बिल्डिंग कामाकरीता अविकसीत राज्यातील गरिब मजूर आणण्यात आले आहे. हे कामगार काही एकटे तर काही कुटुंबासह राहतात. बिजेवार मित्रांसह कामावर रोजी रोटी कमावण्यासाठी कामाला लागला होता.

गरिब कुटुंबातील तरुणांचे बांधकाम करताना मृत्यू झाल्याने कामगार वर्गाच्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर 115/20 सी आर पी सी 174 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com