राहाता तालुक्यातील 10 शाळा बीओटी तत्वावर बांधण्याच्या हालचाली सुरू

राहाता तालुक्यातील 10 शाळा बीओटी तत्वावर बांधण्याच्या हालचाली सुरू

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील दहा प्राथमिक शाळा बांधा, वापरा व हस्तांतरित करा या योजनेतून बांधण्याच्या शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने आवश्यक माहिती शिक्षण विभागाने मागविली आहे.

बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या माध्यमातून शासन स्तरावर अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. रस्ते, बस स्थानक तसेच जिल्हा परिषदांच्या अखत्यारीत येणार्‍या प्राथमिक शाळाही या माध्यमातून बांधण्यात येत आहेत. नगर जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाने राहाता तालुक्यातील दहा शाळा बीओटी तत्वावर बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये साकुरी येथील गोदावरी वसाहत शाळा, प्रा. शाळा राजुरी, प्रा. शाळा बाभळेश्वर, प्रा. शाळा पिंपरी निर्मळ, प्रा. शाळा एकरूखे, प्रा. शाळा सावळीविहीर, प्रा. शाळा निमगाव कोर्‍हाळे, प्रा. शाळा अस्तगाव, प्रा. शाळा केलवड, प्रा. शाळा पुणतांबा या शाळांचा समावेश आहे.

बीओटीमध्ये या शाळांना आवश्यक भौगोलिक सुविधा यात वर्ग खोल्या, कीचन शेड, स्वतंत्र मुख्याध्यापक खोली, स्वतंत्र स्वच्छता गृह मुले व मुली, ग्रंथालय खोली, संगणक खोली, पिण्याचे पाणी, संरक्षक भिंत, रॅम्प, सांस्कृतिक हॉल आदींचा समावेश असणार आहे. तालुक्यात यापुर्वीही काही शाळांचे बांधा, वापरा व हस्तांतरित करा या माध्यमातून काम झालेले आहे. प्रस्तावित शाळांचे काम या माध्यमातून झाल्यास या गावातील शाळांतील विद्यार्थ्यांना सर्व सुविधांनी युक्त नवीन शाळा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com