बांधकाम विभागामुळे झेडपीच्या इभ्रतीचा प्रश्न

बांधकाम विभागामुळे झेडपीच्या इभ्रतीचा प्रश्न

गळके सभागृह, बांधकाम विभागात खासगी व्यक्तींचा शिरकाववर परजणे संतप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद (Zilla Parishad) सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागातील अधिकारी (Construction Department Officers), कर्मचारी यांच्या कामावर आक्षेप घेत या विभागामुळे झेडपीच्या (Zilla Parishad) उज्वल परंपरेला छेद जाण्याची भिती सदस्य राजेश परजणे (Rajendra Parjane) यांनी व्यक्त केली. यासह जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) सभागृहात गळणारे पाणी (Water), लिफ्टचा विषय, खासगी व्यक्तींचा बांधकाम विभागातील वाढलेला हस्तक्षेप, टेंडरला (Tender) होणारा उशीर, वेळेत कामे पूर्ण न करणार्‍या ठेकेदारांवर (Contractor) कारवाई करण्याकडे झालेले दुर्लक्ष (Ignore) यामुळे जिल्हा परिषदेलाच (Zilla Parishad) गालगोट लागण्याची भिती परजणे (Rajesh Parjane) यांनी व्यक्त केली.

सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या तासात जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) नवीन लिफ्टच्या विषयावर बांधकाम विभागातील त्रुटी परजणे (Rajesh Parjane) यांनी अधोरेखीत केल्या. यावेळी नगर जिल्हा परिषदेला (Nagar Zilla Parishad) मोठी परंपरा आहे. मात्र, बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेतील गोंधळ (Confusion in the tender process in the construction department), बाहेरच्या व्यक्ती या ठिकाणी बसून काम करतात, कामाची काळ मर्यादाचे पालन न होणे, शाळा खोल्यांचे काम रखडविणार्‍या ठेकेदारांना कारवाई न करणे याबाबत परजणे (Rajesh Parjane) यांनी नाराजी व्यक्त करत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी वेळीच लक्ष देण्याची मागणी (Demand) केली. आता केवळ तीन महिने शिल्लक असून वेळत कामे पूर्ण न केल्यास त्याचा उपयोग होणार नाही हे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. पाच दिवसांचा आठवडा असतांना कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्या निराधारांना लाभ द्या : गडाख

जिल्ह्यात कोविडमुळे पालक गमावून उघडवर आलेल्या कुटूंबांना जिल्हा परिषदेने व्यक्तीगत लाभाच्या योजनेतून प्राधान्यांने लाभ देण्याची मागणी सभापती सुनील गडाख (Sunil Gadakh)यांनी केली. त्यावर सदस्य जालींदर वाकचौरे (Jalidar Wakchaure) यांनी जिल्ह्यात 6 हजार 500 हून अधिक महिला कोविडमुळे विधवा झाल्या असून त्यांना प्राधान्यांने लाभ मिळावा, अशी मागणी केली.

समप्रमाणात लस द्या : कातोरे

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात समप्रमाणात करोना लस देण्याची मागणी सदस्य एस.एम. कातोरे (S.M. Katore)यांनी केली. या विषयावर त्यांनी बराच वेळ चर्चा केली. संगमनेर तालुक्यातील प्राथमिक केंद्रा अंर्तगत लोकसंख्या अधिक असल्याने जनतेला दिलासा द्यावा, असे कातोरे (S.M. Katore) म्हणाले. तर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कामाकाजावर सदस्य शरद नवले (Sharad Navale)यांनी नाराजी व्यक्त केली. अपंग प्रमाणपत्रासाठी अकोलेच्या जनतेचे हाल होत असल्याचे सदस्या सुष्मा दराडे (Shushama Darade) यांनी सांगितले.

समप्रमाणात शाळा खोल्या द्या : दराडे

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने (Zilla Parishad Primary Education Department) सदस्यांना समप्रमाणात शाळा खोल्या देण्याची मागणी सदस्य सुष्मा दराडे यांनी केली. हीच मागणी सदस्य उज्वला ठुबे यांनी लावून धरली. या विषयावर उपाध्यक्ष प्रताप पाटील (Pratap Shelke Patil) यांनी स्पष्टीकरण दिले. याच दरम्यान लाईट केल्याने वेळेवर जनरेट सुरू न झाल्याने परजणे (Rajesh Parjane)यांच्या संतापात भर पडली.

पुरग्रस्तांना घरकुल द्या : काकडे

शेवगाव-पाथर्डीमध्ये पूर (Shevgav Pathardi flood)आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेली आहे. या ठिकाणी तातडीने प्राधान्याने घरे नसणार्‍यांना घरकुल देण्याची मागणी सदस्य हर्षदा काकडे (Harshada Kakde)यांनी केली. तसेच एका घरकुलाचा लाभ दिलेल्या आणि पुरात घर वाहून गेलेले अथवा पडलेल्यांना पुन्हा लाभ देण्याची मागणी सदस्य हर्षदा काकडे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com