विद्युत वाहिनी जोडतांना कर्मचार्‍याचा मृत्यू

विद्युत वाहिनी जोडतांना कर्मचार्‍याचा मृत्यू

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

पारनेर येथील कन्हेर ओहळ परिसरामध्ये एका खाजगी वर्कशॉपची विद्युत वाहिनी जोडणी करत असताना

एका खाजगी ठेकेदारामार्फ काम करत असताना एका कर्मचार्‍याचा विद्युत वाहिनीला चिकटल्याने जागीच मृत्यू झाला आहे.

पारनेर येथील कन्हेर ओहळ येथे मंदार नाईक यांच्या खाजगी वर्कशॉपसाठी विद्युत वाहिनीची जोडणी करत असताना कर्मचारी मुकुंदा रोडे (वय 23, सध्या राहणार पठारवाडी कायमचा पत्ता परभणी) हा कर्मचारी संबंधित ठिकाणी काम करत असताना विद्युत वाहिनी जोडणीसाठी पोलवर चढला.

तत्पूर्वी पोलवरील सप्लाय बंद करण्यासाठी महावितरणाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क केला गेला असल्याबाबत खातर जमा केली असल्याची माहिती ठेकेदार गाडीलकर यांनी दिली, मात्र महावितरणच्या गलथान कारभारामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे विद्युत वाहिनीच्या तारेला चिटकून या कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत संबंधित महावितरणच्या अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी कर्मचार्‍यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे.

याची चौकशी सुरू आहे, असे उत्तर दिले आहे. मात्र घटनास्थळी पत्रकार पोहोचले असता तेथील कर्मचार्‍यांनी माहिती देण्यास टाळले. तसेच ताबडतोब घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे

ठेकेदाराशी संपर्क केल्यानंतर त्यांनी विद्युत वाहिनी बंद करण्यासाठी महावितरणला कळवले असल्याची माहिती समजली आहे मात्र त्यानंतरही या कर्मचार्‍याच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण आहे. याबाबत चौकशी होणे बाकी आहे. महावितरण किंवा ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जबाबदार कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे. या प्रकरणी प्रकारची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली नाही. यावरून झालेल्या मृत्यूबाबत संशय बळावला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com