संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने

राज्यव्यापी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. 6 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावाधीत राज्यभरातून 25 हजार पिशव्या रक्त संकलन करण्याचे उदिष्ट्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून फक्त आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रदेश काँग्रेसने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

राज्यभरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हा तसेच ब्लॉक स्तरावर रक्तदान शिबीरे आयोजित करुन जास्तीत जास्त पिशव्या रक्त संकलन करावे, असे आवाहन नामदार थोरात यांनी केले आहे.