काँग्रेसचे पाथर्डीत सत्याग्रह आंदोलन

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध
काँग्रेसचे पाथर्डीत सत्याग्रह आंदोलन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

केंद्रातील मोदी सरकार ईडीचा वापर करून राजकीय सूडबुद्धीने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना जाणिवपूर्वक लक्ष करून त्रास देत आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केंद्र सरकार विरोधात व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करतील, असा निर्धार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख यांनी केला.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलाविल्याने केंद्र सरकारच्या हुकूमशाही व दडपशाही धोरणा विरोधात शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पाथर्डी तालुका काँग्रेसच्यावतीने बैठा सत्याग्रह आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यावेळी शेख बोलत होते.

यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रा.जालिंदर काटे, युवक काँग्रेचे तालुकाध्यक्ष प्रकाश शेलार, उपाध्यक्ष संभाजी पाठक, जुनेद पठाण, अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष गणेश दिनकर, उपाध्यक्ष अशोक काळोखे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष किशोर डांगे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र पालवे, पोपट बडे, पापाभाई तांबोळी, तालुका सरचिटणीस अनिल साबळे, शिवाजी नन्नवरे, सूर्यभान गर्जे, मुन्ना खलिफा, सुभाष भाबड, राहुल ढाकणे, महेश दौंड, राजू क्षेत्रे, संपत क्षेत्रे, बंडू भाऊ वाघ, जब्बार आतार, मोहम्मद शेख, नंदू दुधाळ, विकास दिनकर, श्रीकांत भोसले, गणेश काकडे, शहजादे शेख यांच्या काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com