जनता कर्फ्यू, लॉकडाऊन नकोच

कॉग्रेसचे कलेक्टर, आयुक्तांना निवेदन
जनता कर्फ्यू, लॉकडाऊन नकोच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घराबाहेर जावे तर करोना-घरात बसावे तर रोजी रोटी दूरपास्त अशी नगरसह सर्वत्र अवस्था आहे. पण, करोनाच्या भितीने घरात बसून, सर्वसामान्य जगणार कसे ?

ज्यांची हातावरची पोट आहेत, त्यांना दररोज रोजगारासाठी घराबाहेर पडावेच लागते, त्याशिवाय त्यांच्या घराची चूल पेटत नाही, म्हणून सद्या जनता कफ्यु, लॉकडाऊन लागू करु नये, अशी मागणी अहमदनगर व भिंगार शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.

पक्षाचे नगर शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ व भिंगार काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांच्यासह कमिटीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना याबाबत निवेदन दिले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावाने आपण सर्वजन हतबल आहोत. जगाला या व्याधीने ग्रासले आहे. आज जीव वाचविणे महत्वाचे ठरत आहे, पण घरात राहून उपाशी मरावे का? असा सवाल सर्वसामान्य, गरीब करत आहे. त्याकडे कसे दुर्लक्ष करणार असे नमूद करुन निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोणताही निर्णय हा समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकाचा विचार करुन घेतला जातो आणि या घटकांची बहुसंख्य आहे, त्यामुळे त्यांची रोजीरोटीसाठीची धडपड रोखणे गैर ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे.

मात्र लाकडाऊनमधून सवलती मिळतात म्हणून घरातून सर्वांनीच घराबाहेब पडावे, असे नाही. त्यांना रोजगार मिळवायचा आहे, त्यांनीही शिस्तबद्ध काटेकोर नियमांचे पालन करुन सुरक्षित अंतर राखून कामधंदे करावे, सवलत मिळाली तर ती तिचा लाभ घ्या, मात्र, त्याचा गैरफायदा घेऊ नका अन्यथा आपण, आपले परिवारासह अन्य कोरोनाचे बळी पडू शकला, असे जनतेला उद्देशून निवेदन केले आहे.

आज करोना प्रादुर्भावाची संख्या विचारात घेता जनतेनेही शिस्त, नियमांचे पालन करावे, असे आवाहन कमिटीने केले आहे. राजकारण बाजूला ठेवून करोना संकटाचा सामना करावयाचा आहे. परिस्थितीत सुधारणा घडाव्या या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत ते नाकारता येणार नाही.

पूर्ववत परिस्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळा, कॉलेज सुरु करण्याचा निर्णय जसा घेतला जाणार आहे, तसे वाहतुकीचे पर्याय उदा. बस, लोकल, एस.टी., रेल्वे सुरु करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

लग्न समारंभासाठी 100 जणांची उपस्थिती, शासकीय-निमशासकीयसह अन्य कार्यालयातील वाढती उपस्थिती, व्यवसाय पुन्हा उभे राहण्यासाठी कर्ज उपलब्ध, रेशन, धान्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने, धार्मिक स्थळे उघडण्याचा विचार आदि निर्णय जनतेच्या हिताचे ठरावे आदि निर्णय जनतेच्या हिताचे ठरावे, असे प्रयत्न सरकार आणि जनता यांच्यातील समन्वयाने होतील, अशी शहर काँग्रेसला अपेक्षा आहे.

या अपेक्षापूर्तीसाठी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते समाजात कार्यरत असणार असून, त्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना तो सादर करणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com