नगर जिल्ह्यात काँग्रेसचे 17 मतदार

संगमनेरात सर्वाधिक 5, श्रीरामपूर, श्रीगोंद्यात प्रत्येकी दोन मतदार || काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक|| राहुरी, राहाता आणि कोपरगावात काँग्रेसचा एकही मतदार नाही
नगर जिल्ह्यात काँग्रेसचे 17 मतदार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तब्बल दोन दशकांनंतर होणार्‍या अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातून 17 प्रदेश प्रतिनिधी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. हे सर्व जण 17 ऑक्टोबरला मुंबईत मतदान करणार आहेत. यात सर्वाधिक पाच मतदार संगमनेरातील आहेत. श्रीरामपूर, श्रीगोंद्यात प्रत्येकी दोन मतदार आहेत. तर राहुरी, राहाता आणि कोपरगावात काँग्रेसचा एकही मतदार नाही.

काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे व शशी थरूर असे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आता या निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, 17 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 565 प्रदेश प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार आहे. यात नगर जिल्ह्यातील 17 जणांचा समावेश आहे. या प्रतिनिधींनी 17 रोजी मुंबईत वेळेत हजर राहावे व येताना पक्षाने दिलेले प्रदेश प्रतिनिधी कार्ड व आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड ओळखपत्र समवेत आणण्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या मतदार यादीतील 565 मतदारांमध्ये नगर शहरातील एक व नगर जिल्हा ग्रामीण भागातून 16 मतदार आहेत. पक्षाचे विधीमंडळ गट नेते व संगमनेरचे आ. बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे (श्रीरामपूर), नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे (संगमनेर) यांच्यासह प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा नाईक (अकोले), प्रतिनिधी करण ससाणे (श्रीरामपूर), विनायक देशमुख (नगर-प्रदेश सरचिटणीस), जयश्री बाळासाहेब थोरात (संगमनेर), हेमंत ओगले (श्रीगोंदे-प्रदेशसरचिटणीस), सचिन गुंजाळ (संगमनेर-प्रदेश सचिव), प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे (संगमनेर), कैलास शेवाळे (कर्जत- उपाध्यक्ष ग्रामीण), नगर ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके (कर्जत), राजेंद्र नागवडे (श्रीगोंदे), संपतराव म्हस्के (माजी अध्यक्ष, नगर तालुका), डॉ. एकनाथ गोंदकर (शिर्डी-उपाध्यक्ष ग्रामीण) व ज्ञानदेव वाफारे (पारनेर) असे 16 मतदार नगर ग्रामीणमधील असून, नगर शहरातील एकमेव मतदार दीप चव्हाण आहेत. ते नगर शहराचे माजी शहर जिल्हाध्यक्ष आहेत. अशा जिल्ह्यातील 17 जणांना नवा काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी 17 रोजी मतदान करण्याचा अधिकार असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com