काँग्रेसच्यावतीने नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा

हाथरस घटना तसेच प्रियांका व राहुल गांधींवरील हल्ल्याचा निषेध
काँग्रेसच्यावतीने नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

उत्तरप्रदेशातील हाथरस घटनेतील आरोपींना कडक शासन करण्यात यावे, केंद्र सरकारने

शेतकरी व कामगार विषयी आणलेले कायदे मागे घेण्यात यावेत या मागणीसह काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत नेवासा येथे काँग्रेसच्यावतीने तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.

पंचायत समितीच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकामार्गे मोर्चा तहसील कचेरीवर गेला.

हाथरस येथील घडलेल्या घटनेत पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी बँड कलावंतांना पन्नास हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवासी नायब तहसीलदार संजय परदेशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजेंद्र वाघमारे, शहराध्यक्ष रंजन जाधव, संभाजी माळवदे, जाकीर शेख, कार्लस साठे, सुदाम कदम, प्रवीण तिरोडकर, साहेबराव पवार, संदीप मोटे, नंदकुमार कांबळे, पोपट सरोदे, तान्हाजी वाल्हेकर, तन्वीर शेख, रावसाहेब घुमरे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com