मोदी सरकार जुलमी

मोदी सरकार जुलमी

पाथर्डी शहरात इंधन दरवाढ विरोधात सायकल रॅली

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

केंद्रातील भाजपाप्रणीत मोदी सरकार (Central BJP Modi Government) हे जुलमी सरकार (tyrannical government) असून हिटलरशाहीने वागत आहे.सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम मोदी सरकार (Modi Government) करत असून देशात महागाईने उच्चांक (Inflation) गाठला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे (Congress) तालुकाध्यक्ष नासीर शेख यांनी मोदी सरकारवर टीका (Criticism of Modi government) केली.

महागाई व इंधन दरवाढ याविरोधात पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुकाध्यक्ष नासिर शेख यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत पाथर्डी शहरात केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख, तालुका उपाध्यक्ष रवींद्र पालवे, आनंद सानप, तालुका सरचिटणीस आदिनाथ देवढे, जिल्हा सरचिटणीस प्रा. जालिंदर काटे, कराड, सुधीर कराड, युवक उपाध्यक्ष जुनेद पठाण, नबाबभाई शेख, सेवादलाचे अध्यक्ष किशोर डांगे, तालुका संघटक सचिन राजळे, शहराध्यक्ष दत्ता पाठक, कार्याध्यक्ष धनराज घोडके, महेश दौंड, जब्बार आतार, उदय वारुळे आदी सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com