बाळासाहेब थोरातांना दुखापत; रुग्णालयात दाखल

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

संगमनेर । प्रतिनिधी

नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एककीडे महाराष्ट्रात कर्नाटक सीमावादचा प्रश्न तापला असताना दुसरीकडे मोठी घटना घडली आहे.

बाळासाहेब थोरात
प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचं निधन, ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. आ. थोरात हे मॉर्निंग वॉक करत असतांना खोलगट भागात पाय गेल्याने ते पडले व डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना नियमित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीसाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. काळजी करण्यासारखे कारण नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com