पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) -

केंद्र सरकारने संमत केलेले कृषि कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करावेत. या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षाच्या वतीने

शुक्रवारी (दि. 26) भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत पाथर्डी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषण करत पाठिंबा दिला.

दिल्लीमध्ये 100 दिवसापेक्षा जास्त काळ आंदोलन चालले आहे. त्यामध्ये 300 पेक्षा अधिक शेतकर्यांचा मृत्यू झाला असून त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. याचा निषेध म्हणून प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी भारत बंदचे अवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत पाथर्डी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष नासिर शेख यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या आवारात पदाधिकार्यांनी उपोषण करत केंद्र सरकारचा निषेध केला.

यावेळी नासिर शेख म्हणाले, केंद्र सरकारने संमत केलेले कृषि विधेयके शेतकरी विरोधी असून जुलमी व काळे कायदे आहेत. ते तातडीने रद्द करावेत. यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांनी वेळोवेळी आंदोलने करून विरोध केला आहे. तर शुक्रवारी भारत बंदची हाक दिली होती.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश उपाध्यक्ष एम. एम. शेख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या सुचनेवरून काँग्रेस व मित्रपक्षांचे पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणास बसले आहेत. केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांच्या भावना समजून घेऊन कृषि कायदे तातडीने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात जिल्हा काँग्रेस सहसचिव प्रा. जालिंदर काटे, जिल्हा प्रतिनिधी नवाबभाई शेख, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शेलार, उपाध्यक्ष शरद पवार, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र पालवे, अमोल गाडे, पोपट बडे, सिकंदर शेख, तालुका सरचिटणीस संजय कराड, सूर्यभान गर्जे, आदिनाथ देवढे, सुधीर कराड, काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष किशोर डांगे, उपाध्यक्ष असलम सय्यद, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिगंबर सोलट, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन गरड, एस. टी. विभागाचे तालुकाध्यक्ष गणेश दिनकर,

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता पाठक, मागासवर्गीय सेलचे तालुका उपाध्यक्ष सुरेश नवगिरे, तालुका सरचिटणीस संजय कराड, सूर्यभान गरजे, अनिल साबळे, आदिनाथ देवढे, सुधीर कराड, उदय वारूळे रवींद्र घाटे, आदिनाथ ढोले, विष्णू सोळसे, शामीर शेख आदी सहभागी झाले होते. आंदोलनाला आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, भगतसिंह देवढे आदिंनी पाठिंबा दिला. यावेळी जोरदार घोषणाबाजी व टिका करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तहसिलदार शाम वाडकर यांना निवेदन देण्यात आले.