
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
काँग्रेस पक्षाच्या सामन्यातील सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जाईल व ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेले दोन दिवसीय चिंतन शिबिरासाठी हे आले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम व काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने ना. राऊत यांची शिर्डी येथे भेट घेऊन फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेस प्रदेश अ. जा. वि समन्वयक संजय भोसले यांनी सत्कार केला. यावेळी काँग्रेस अ. जा. वि. कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नाबाबत ना. राऊत यांच्याबरोबर चर्चा केली.
यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेस अ. जा. वि. अध्यक्ष राजेद्र वाघमारे, काँग्रेस प्रदेश समन्वयक बंटी यादव, काँग्रेस प्रदेश सांस्कृतिक विभागाचे कडु पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, शिर्डी शहर काँग्रेसचे उमेश शेजवळ, फोरमचे प्रकाश भिगारदिवे, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हा सचिव दिपक कदम राहुरी तालुका काँग्रेस अ. जा. वि तालुकाध्यक्ष बाबासाहेब सगळगिळे, अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाथा भाऊ आल्हाट, प्रदेश काँग्रेस एन. टी. वि. सचिव शिवाजी बर्डे, गोरक्ष अनाप पाटील, गोरख विखे, सचिन शिंदे, सोमनाथ शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.