इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे अभियान

31 हजार स्वाक्षर्‍या संकलित करण्याचा संकल्प
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे अभियान

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असून गगनाला भिडत आहेत. मोदी सरकार बद्दल यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढीच्या विरोधात नागरिकांच्या स्वाक्षरी अभियानाला ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्याहस्ते नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानामध्ये 31 हजार नागरिकांच्या स्वाक्षर्‍या संकलित केल्या जाणार आहेत.

शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयात स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ नुकताच झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष माळी, यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रिडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय कुलट आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या आदेशावरून नगर शहरामध्ये प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. मोहन जोशी, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, अभियानाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक तथा प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्ये इंधन दरवाढीविरोधात स्वाक्षरी अभियान राबविले जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com