देवळाली प्रवरात काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी; इंधन दरवाढीचा निषेध
देवळाली प्रवरात काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

देवळाली प्रवरा (वार्ताहर) / Deolali Pravara - देवळाली प्रवरा शहर काँग्रेसच्या वतीने केंद्रसरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात येथिल बाजारतळा वरील शेतकरी पुतळ्या जवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ना.बाळासाहेब थोरात आ.सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडीसह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून इंधन दरवाढीचा निषेध केला.

आ. लहू कानडे म्हणाले, इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला असून महागाई आभाळाला भिडली आहे. सामान्य माणसाला दिलासा मिळण्यासाठी मोदी सरकारने केलेली इंधन दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, असे आवाहन आमदार कानडे यांनी केले.काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण म्हणाले, उज्ज्वला गॅसचे गाजर महिलांना दाखवले. गॅस दरवाढीमुळे महिलांकडे गॅसटाकी घ्यायला पैसे नाहीत. कुठे गेले ते पंधरा लाख? कुठे गेले ते अच्छे दिन? असा सवाल करुन देवळालीपासून दिल्लीपर्यंत हीच निती भाजपाची आहे. इंधन दरवाढ मोदी सरकारने त्वरीत मागे घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव म्हणाले, अच्छे दिनाचे गाजर दाखवून मोदी सरकारने सामान्य माणसाची दिशाभूल केली आहे. भाजपाच्या नितीमुळे आज सर्वसामान्य माणूस व महिला महागाईच्या चरकात पिळवटून निघाल्या आहेत. भूलथापा देऊन जनतेला फसविणार्‍या केंद्र सरकारचा नकली मुखवटा समोर आला आहे. जनता या बेगडी सरकारला माफ करणार नाही, असे आढाव यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक नानासाहेब कदम यांनी केले. यावेळी करण ससाणे, सचिन गुजर, शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, वैभव गिरमे, जयेश माळी, संजय पोटे, यांनी मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनात कृष्णा मुसमाडे, कुणाल पाटील, दीपक पठारे, उत्तमराव कडू, जावेद सय्यद, मयूर आडागळे, अनिकेत साळुंखे, गंगाधर गायकवाड, कुमार भिंगारे, राजेंद्र लोखंडे, भाऊसाहेब गुंजाळ, नितीन घुगरकर, दत्तात्रय मुसमाडे, आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com