‘ईडी’ विरोधात काँग्रेस आक्रमक; संगमनेरमध्ये धरणे आंदोलन

‘ईडी’ विरोधात काँग्रेस आक्रमक; संगमनेरमध्ये धरणे आंदोलन

संगमनेर | प्रतिनिधी

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी चौकशी सुरु आहे. याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देशभरात आंदोलन (Congress Protest) पुकारण्यात आलंय. संगमनेर बस स्थानक येथे विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्यावरील चुकीच्या ईडी कारवाईच्या निषेधार्थ मोदी सरकार विरुद्ध धरणे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. 1885 ते 1947 या कालखंडात अनेक स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेललेल्या आहेत. त्यामुळे ईडी व तत्सम केंद्रीय यंत्रणांच्या दबावाला काँग्रेस कार्यकर्ते कधीही घाबरणार नसून खा. श्रीमती सोनिया गांधी ह्या आजारी असताना त्यांना त्रास दिला जात असून त्यांच्यावरील चुकीच्या ईडी कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे आमदार डॉ. तांबे यांनी म्हटले असून या कारवाईच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

आमदार तांबे म्हणाले, भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अत्यंत अपयशी ठरले जात असून या अपयशाविरुद्ध आवाज उठवणार्‍या काँग्रेस पक्षावर ते ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात अवघ्या 40 ईडी कारवाया झाल्या होत्या. मात्र भाजपच्या काळात 4000 ईडी कारवाया झाल्या आहेत. हे द्वेषाचे राजकारण अत्यंत चुकीचे असून सोनिया गांधी या खंबीर आहेत. लढवैय्या आहेत. त्या कधीही अशा कारवायांना भीक घालणार नाही. त्यांच्या पाठीशी पूर्ण भारतातील जनता असल्याचेही आमदार डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.

यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संचालक इंद्रजीत भाऊ थोरात, तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, लक्ष्मणराव कुटे, प्रा. बाबा खरात, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, सुरेश झावरे, युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा, शकील पेंटर, अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद शेख, शहर उपाध्यक्ष गणेश मादास, शफी तांबोळी, उबेद शेख, सुरेश थोरात, आनंद वर्पे, निलेश थोरात, गौरव डोंगरे आदींसह काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com