मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांचा गोंधळ

'या' रुग्णालयात घडली घटना
मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांचा गोंधळ

अहमदनगर | Ahmedagar

करोनामुळे मृत झालेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला.

जिल्हा शासकीय रुग्णालयात आज सकाळी ही घटना घडली. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक निरीक्षक किरण सुरसे, सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांना रुग्णालयातून बाहेर काढले.

करोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्यास मृतदेह ताब्यात दिला जात नाही. रुग्णालयाच्या मदतीने मनपा प्रशासन त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करते. अंत्यसंस्काराची जबाबदारी एका ठेकेदाराला दिली आहे. करोना मृत रुग्णांपासून बाधा होण्याचा धोका असतो म्हणून मृतदेह ताब्यात देण्यास बंधने आहेत.

परंतु जिल्हा रुग्णालयात एका करोना महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने दफनविधी करणार आहोत, आम्हाला मृतदेह ताब्यात द्या, असे म्हणत मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आवारात चांगलाच गोंधळ घातला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com