सार्वजनिक ठिकाणी गोंधळ ; दोन पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

शिवाजी धुमाळ, बाबासाहेब नाईकवाडी, माजी सरपंचासह कार्यकर्त्यांवर गुन्हा
सार्वजनिक ठिकाणी गोंधळ ; दोन पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

पोलिस ठाण्याच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून मोठ्याने आरडाओरड करत शिवीगाळ मारामारी करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, युवक काँग्रेसचे बाबासाहेब नाईकवाडी, अकोलेच्या माजी सरपंच सुमन जाधव, अनिकेत जाधव व इतर 7 ते 8 जणांविरुध्द अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस ठाण्यात येवून राजकीय पुढारी पोलिसांच्या समोर अरेरावी, दमदाटी, शिवीगाळ, हाणामारी करत सार्वजनिक शांततेचा भंग करतात याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता वरील चौघांसह 11 ते 12 जणांविरुद्ध भा.द.वि.कलम 160 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोशल मिडियाच्या एका वादग्रस्त पोस्ट वरून हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. या प्रकरणी भाजपच्या एका युवक पदाधिकार्‍यावर कारवाई करण्यात आली.

या प्रकरणाच्या अनुषंगाने 18 एप्रिल 2021 रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता राजकीय पुढारी कार्यकर्ते पोलिस ठाण्यात आले होते. त्यांच्यात पोलिसांसमोर पोलिस ठाण्याच्या आवारात शिवीगाळ, मारामारी झाली होती. त्यानंतर चार दिवसांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घालणार्‍या संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस नाईक बारकू बाळू गोंधे यांचे फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर तळपे करत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com