कंडक्टरची शिर्डीत गळफास घेऊन आत्महत्या

कंडक्टरची शिर्डीत गळफास घेऊन आत्महत्या

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पुणे-शिवाजीनगर ते शिर्डी ही एसटी महामंडळाची बस घेऊन आलेल्या एसटी कंडक्टर अरुण अर्जुन सस्ते (वय 40) याने 11 मार्च 2023 रोजी पहाटे निमगाव कोर्‍हाळे शिवारातील एका वस्तीलगत काटवणात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेने शिर्डी शहरात खळबळ उडाली असून परिवहन महामंडळाच्या कंडक्टरने कर्तव्यावर असताना इतक्या टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com