नेवासा तालुक्यातील 'या' गावात पुन्हा संपुर्ण लॉकडाऊन

नेवासा तालुक्यातील 'या' गावात पुन्हा संपुर्ण लॉकडाऊन

चांदा | वार्ताहर

नेवासा (newasa) तालुक्यातील कुकाणापाठोपाठ (kukana) आता चांदा (chanda) गावही आजपासून संपुर्ण लॉकडाऊन (lockdown) करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असून आजपासून चांदा गाव १४ तारखेपर्यंत संपुर्ण लॉकडाऊन (lockdown) असणार आहे.

चांदा (chanda) येथील वाढती रुग्णसंख्या (corona patient) याचा विचार करता जिल्हाधिकारी यांनी काल या संदर्भात आदेश काढले असून त्यानुसार आज सकाळी नेवासा तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, सोनई पोलिस स्टेशनचे सपोनी रामचंद्र कर्पे, बिडीओ शेखर शेलार, तालुका वैद्यकिय अधिकारी अभिराज सुर्यवंशी आदि अधिकारी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आले. सर्व परीस्थितीची पाहणी करत तहसिलदार सुराणा यांनी सर्व विभागांना आवश्यक ते आदेश दिले.

ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात सर्व सुचना करण्यात आल्या असून त्यानुसार १४ तारखेपर्यंत गावातील व्यक्ती बाहेर आणि बाहेरगावातील व्यक्ती गावात येण्यास बंदी घालण्यात आली असून लॉकडाऊनच्या काळात शंभर टक्के लसीकरण पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण गाव बंद करण्यात आले आहे.

खाजगी डॉक्टर्स यांची मदत घेऊन आरोग्य केंद्राचे पथक वार्डनिहाय लसीकरण करणार आहे. गेल्या काही दिवसापासून गावात रूग्णसंख्या वाढत होती. त्यातचभर म्हणजे सोशल डिस्टनचा विसर नागरीकांना पडल्याचे चित्र गर्दीवरून दिसत होते. आता १४ तारखेपर्यंत सर्व व्यवहार बंद झाले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकित गावच्या सरपंच सौ ज्योती जावळे उपसरपंच चांगदेव दहातोंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत गावातील डॉक्टर्स, प्राथमिक शिक्षक, तलाठी वाडेकर, व्यापारी वर्ग आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.