प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकार्‍याची तक्रार

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकार्‍याची तक्रार

सलाबतपूर (वार्ताहर) - तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांचा आपल्याला जाच सहन करावा लागत असल्याची तक्रार तालुक्यातील सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया भाऊसाहेब कर्डिले यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

तक्रारीत त्यांनी म्हटले की, माझ्या कामकाजात काही त्रुटी आढळून आल्यास ते धमकी देतात. तहसील कार्यालयात मिटींगला का आल्या नाहीत? याबाबत कडक स्वरुपात विचारणा केली. सदर मुद्यावर समाधानकारक उत्तर देवूनही दोन-तीन दिवसापासून त्या मुद्द्यावरुन अपमानास्पद बोलत आहे. त्रास देण्याची मनोवृत्ती असलेल्या या अधिकार्‍यावर कारवाई करावी असे तक्रार निवेदनात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com