
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) चोरीला गेलेले व हरवलेले चार लाख वीस हजार रूपये किमतीचे 20 महागडे मोबाईल (Mobile Theft) तक्रारदारांना परत केले आहेत. विशेष मोहीम राबवून पोलिसांनी मोबाईल हस्तगत केले आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मूळ तक्रारदारांना मोबाईल परत केले. (Mobile Returned)
कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दाखल झालेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना निरीक्षक यादव यांनी पोलीस अंमलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीतील तब्बल चार लाख वीस हजार रूपये किमतीचे 20 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. चोरीतील मोबाईल (Mobile) परत मिळाल्यावर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार, निरीक्षक यादव यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले. चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग तसेच आयफोन कंपनीचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील काही तक्रारदारांनी गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही सोडून दिली होती. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक यादव, अंमलदार सलीम शेख, राजेंद्र फसले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार नितीन शिंदे यांनी कारवाई केली.