पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच ठरविले चोर

तक्रारदाराचा उपोषणाचा इशारा
पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच ठरविले चोर

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या (Sangamner Taluka Police Station) कारकिर्दीपासून सातत्याने वादग्रस्त (Dispute)ठरलेले पोलीस निरीक्षक सुनील पाटील (PI Sunil Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी चोरीची (Theft) फिर्याद घेऊन आलेल्या तक्रारदारालाच संशयाच्या कठड्यात उभे करुन त्यांना अपमानास्पद वागणूक (Abusive Behavior) देण्याचा प्रकार घडला. संबंधिताने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत पोलीस निरीक्षक पाटील (PI Sunil Patil) यांच्या मनमानी कारभाराविरोधात थेट मुख्यमंत्री (CM) व गृहमंत्र्यांसह (Home Minister) वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली आहे. कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण (Movement) करण्याचा इशाराही (Hint) त्यांनी दिला आहे.

पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच ठरविले चोर
रतनगडावरुन काढला 9 गोणी प्लॅस्टीक कचरा

याबाबत घारगावच्या कान्होरे मळा परिसरात राहणार्‍या विकास नानाभाऊ कोरडे यांनी नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना लेखी तक्रार पाठविली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या वादग्रस्त कारकिर्दीचा या तक्रारीत पाढाच वाचण्यात आला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास अहमदनगर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार घारगावच्या कान्होरे मळ्यातील त्यांच्या राहत्या घराचा पत्रा उचकटून गेल्या 21 मे रोजी चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच ठरविले चोर
काँग्रेसचे शिर्डीत अधिवेशन

यावेळी घरातील सामानाची उचकापाचक करीत कपाटात ठेवलेले 30 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 25 तोळ्यांचे चांदीचे दागिने व व्यापार्‍याला देण्यासाठी घरात ठेवलेली 1 लाख 65 हजार रुपयांची रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी अतिशय अपमानास्पद आणि हीन दर्जाची वागणूक दिली. यावरही कहर म्हणजे चोरी झालेल्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तक्रारदार विकास कोरडे यांना दमबाजी करीत चोरट्यांनी ऐवज शोधताना अस्ताव्यस्त फेकलेले सामान व कपडे आवरुन ठेवण्यास सांगितले व त्यानंतरच श्वानपथकाला पाचारण केले. त्यामुळे त्यांच्या कृतीचा तक्रारदाराच्या मनात संशय निर्माण झाला. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातून बदली झाल्यानंतर घारगावचा पदभार स्वीकारल्यापासून तेथील गुन्हेगारी घटनांचा स्तर उंचावल्याचेही यात नमूद केले आहे.

पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच ठरविले चोर
निर्यात बंदीने शेतकर्‍यांचे नुकसान

या प्रकरणात विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जातीने लक्ष घालून तपास करावा व पो.नि.पाटील यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा 20 जून रोजी अहमदनगर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पोलीस निरीक्षकाने तक्रारदारालाच ठरविले चोर
जेवण लवकर न दिल्याने हॉटेलातील कुकला भट्टीवर ढकलले

पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासूनच ते सतत वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या येथील आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत चोर्‍या, घरफोड्या, मंदिरातील दानपेट्या पळविण्याचे प्रकार वारंवार घडले असून यातील एकाही घटनेचा शोध लावण्यात आजवर त्यांना यश आलेले नाही. पठारभागातून वाहणार्‍या मुळा नदीपात्रातील वाळू तस्करीलाही त्यांचे पाठबळ असल्याचे आरोप यापूर्वी सातत्याने त्यांच्यावर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भूमिकेकडे घारगावसह संपूर्ण पठाराचे लक्ष्य खिळले आहे.

विकास कोरडे यांच्या घरी जबरी चोरी झाली. त्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर आम्ही त्वरित तपास सुरु केला. परंतु ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांची उलट तपासणीकरणे हा आमचा चौकशीचा एक भाग आहे.

- सुनील पाटील, पोलीस निरीक्षक घारगाव.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com