नुकसान भरपाई न देणार्‍या विमा कंपनीला व्याजासह रक्कम देण्याचा न्यायालयाचा आदेश

नुकसान भरपाई न देणार्‍या विमा कंपनीला व्याजासह रक्कम देण्याचा न्यायालयाचा आदेश

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा एक वर्षाचा विमा काढलेला असताना नुकसान भरपाईस टाळाटाळ करणार्‍या विमा कंपनीला मोटारसायकलच्या रक्कमेसह व्याजाची रक्कम अदा करण्याचा आदेश अहमदनगर जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे.

श्रीरामपूर येथील नंदकुमार रंगनाथ राऊत यांनी नवीन विकत घेतलेली हिरो कंपनीची मोटारसायकल घरासमोर लॉक करून पार्कींग केलेली असतांना रात्री चोरीला गेली. म्हणून श्री. राऊत यांनी पोलिस स्टेशनला गाडी चोरी गेल्याची फिर्याद दिली. त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 16/2018 ने गुन्हा दाखल झाला. नंदकुमार राऊत यांनी गाडीचा इंन्शुरन्स टाटा आय. जी. जनरल इंन्शुरन्स कंपनी 1 वर्षासाठी उतरविलेला होता. म्हणून त्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी इंन्शुरन्स कंपनीकडे पत्र व्यवहार केला. म्हणून इंन्शुरन्स कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे नाकारले.

नंदकुमार राऊत यांनी अहमदनगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर यांच्यासमोर तक्रार दाखल केली. सदर तक्रार अर्जाची चौकशी होवून आयोगाने इंन्शुरन्स कंपनी विरूध्द निकाल दिला. इन्शुनंन्स कंपनीने रक्कम रूपये 44,849/- व त्यावर संपूर्ण रक्कम फिटेपावेतो 12 टक्के व्याजदराने व्याज तक्रारदारास द्याावे. तसेच शारीरीक व मानसिक त्रासाबद्दल 10,000/- रूपये व अर्जाचा खर्च 5,000/- तक्रारदारास द्यावा, असा आदेश इंन्शुरन्स कंपनीला देण्यात आला. सदर तक्रारीचे कामकाज तक्रारदाराचेवतीने श्रीरामपूर येथील अ‍ॅड. किरण जर्‍हाड यांनी पाहिले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com