
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील प्रमुख रस्त्यांवर (Road) झालेल्या अतिक्रमणांवर (Encroachment) तसेच रस्त्यालगतच्या इमारतींमध्ये घर व गाळ्यासमोर शेड मारून करण्यात आलेल्या 270 अतिक्रमणांवर (Encroachment) मार्किंग करण्यात आले आहे. त्याचा अहवाल आयुक्तांकडे ( Commissioner) सादर करण्यात आला आहे. कारवाईच्या नियोजनासाठी सोमवारी मनपा आयुक्तांच्या (Municipal Corporation Commissioner) उपस्थितीत सर्व प्रभाग अधिकारी व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या (Encroachment Removal Department) कर्मचार्यांची एकत्रित बैठक होणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख अभियंता रोहिदास सातपुते यांनी सांगितले.
आयुक्त डॉ. पंकज जावळे (Commissioner Dr. Pankaj Jawale) यांनी अतिक्रमणांवर मार्किंगचे आदेश दिले होते. चारही प्रभाग समिती कार्यालयांसाठी चार स्वतंत्र पथके नियुक्त केली होती. आत्तापर्यंत सावेडी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 79, माळीवाडा-शहर प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 72, झेंडीगेट प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 38, बुरूडगाव प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 81 अशा 270 अतिक्रमणांवर (Encroachment) मार्किंग करण्यात आले आहे. या अतिक्रमणांवर मोहीम राबवून कारवाई करण्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.