आयुक्तांनी गांधीनगर येथील समस्यांची केली पाहणी

आयुक्तांनी गांधीनगर येथील समस्यांची केली पाहणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रभाग क्रमांक 8 मधील गांधीनगर येथील नागरिक समस्यांच्या विळख्यात अडकले आहेत. ड्रेनेज, सांडपाणी, रस्ते व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशी विविध समस्यांना तोंड देत आहेत. गांधीनगर परिसरातील विविध नागरी समस्यांची पाहणी सभापती कुमार वाकळे व आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केली. यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्तांनी गांधीनगर येथील समस्यांची केली पाहणी
खा. डॉ. विखेंनी मागितली (स्व.) राठोड यांची माफी

ड्रेनेज व सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचबरोबर रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट झाली आहे. गांधीनगर परिसरामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक वास्तव्यास आहे तरीसुद्धा आम्ही महानगरपालिकेकडे फेज टू पाणी योजनेचे कनेक्शन घेण्यासाठी पैसेही भरले आहेत तसेच नियमित करही भरतो तरीसुद्धा पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही.

आयुक्तांनी गांधीनगर येथील समस्यांची केली पाहणी
जिल्हा बँकेच्या शाखाधिकार्‍याने केला 25 लाखांचा अपहार

यासाठी आयुक्त डॉ.जावळे यांनी या भागाची पाहणी केली आहे. ड्रेनेज व सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी भुयारी अमृत गटार, भेज टू योजना लवकरात मंजूर होणार आहेत सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रस्त्याच्या कामांसाठीही अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे टप्प्याटप्प्याने ही सर्व कामे मार्गी लावू असे आश्वासन शहर अभियंता इथापे यांनी दिले.

आयुक्तांनी गांधीनगर येथील समस्यांची केली पाहणी
कचरा संकलनाच्या ठेक्याची सात वर्षांपर्यंत वाढवलेली मुदत रद्द

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com