घर बसल्या कमिशन मिळविण्याचे अमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक

घर बसल्या कमिशन मिळविण्याचे अमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घर बसल्या कमिशन मिळविण्याचे अमिष (Commission Lure) दाखवून अज्ञाताने एकाची 1 लाख 45 हजार 936 रूपयांची फसवणूक (Fraud) केली. प्रदीप पोळ (वय 36, रा. सागर कॉम्प्लेक्स, आगरकर मळा) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलिसांत (Kotwali Police) दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 3 रोजी दुपारी पावणेचार वाजता त्यांच्या मोबाईलवर 8805404897 या मोबाईल क्रमांकावरून घर बसल्या कमिशन मिळविण्याचा मेसेज आला.

घर बसल्या कमिशन मिळविण्याचे अमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक
450 बोगस टेस्ट रिपोर्टद्वारे काढली कोट्यवधींची बिले

त्यास रिप्लाय दिल्यानंतर त्याने व्हॉटसऍपवर एक लिंक पाठविली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिंकवर माहिती भरवली. त्यानंतर दि. 4 रोजी लिंकच्या युपीआय आयडीवर (UPI ID) पेटीएमव्दारे 5 हजार 200 रूपये भरले. त्यानंतर दुसर्‍या आयडीवर 18 हजार रूपये पाठविले. पुन्हा त्याने एक आयडी पाठविला. त्यावर 20 हजार रूपये पाठविले. त्यानंतर पुन्हा 20 हजार रूपये पाठविले. त्यानंतर 16 हजार रूपये असे 79 हजार 200 रूपये पाठविले.

घर बसल्या कमिशन मिळविण्याचे अमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक
साई संस्थानचे नूतन कार्यकारी अधिकारी यांच्या एंट्रीने कर्मचार्‍यांची उडाली धांदल

त्यानंतर त्या इसमाने मेसेज करून कमिशन (Commission) पाहिजे असेल तर 20 टक्के टॅक्स भरावा लागेल असे म्हणून पाठविलेल्या एका आयडीवर 30 हजार 736 रूपये भरले. परत त्याने अकांऊंट ऍक्टीवेट करण्यासाठी 30 हजार रूपये भरावे लागतील असे सांगितले. त्याच्या पंजाब नॅशनल बँक गुजरात या अकांऊंटवर 30 हजार रूपये फोन पेव्दारे पाठविले. परंतु त्याने कोणत्याही प्रकारचे कमिशन (Commission) दिले नाही. त्याने विश्वास संपादन करून फसवणूक (Fraud) केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घर बसल्या कमिशन मिळविण्याचे अमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक
महिनाअखेरीस झेडपीच्या भरतीच्या तारखा ?
घर बसल्या कमिशन मिळविण्याचे अमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक
संगमनेरातील अनेक लॉजमध्ये खुलेआम देहविक्री व्यवसाय
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com