बालगोपालांच्या अभिनयाने बहरला कलामंच!

बालगोपालांच्या अभिनयाने बहरला कलामंच!

अहमदनगर (प्रतिनिधी)

बालरंगभुमीला समर्पित असलेल्या कांकरिया करंडक राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धेत बालकलावंतांच्या जीवंत अभिनयाने कलामंच बहरला आहे.

माऊली सभागृह येथे होणार्‍या या स्पर्धेचे यंदा 24 वे वर्ष आहे. कोरोनाचे सर्व अटी नियम पाळून सदर स्पर्धा होत आहेत. उद्घाटन कांकरिया करंडकच्या प्रथेप्रमाणे बालकलाकार पार्थ लोळगे याच्या हस्ते नटराज पूजनाने झाले.

अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, स्वागताध्यक्षा डॉ. सौ. सुधा कांकरिया, सचिव सदाशिव मोहिते, सहसचिव उमाकांत जांभळे, परिक्षक बाळकृष्ण धायगुडे (लातूर), श्री एस जी हळदिकर (कोल्हापूर), सौ सुप्रिया सचिन भागवत (सातारा), बापू चंदनशिवे, दशरथ खोसे हे उपस्थित होते.

स्व. कन्हैय्यालालजी कांकरिया स्मृती मानकन्हैय्या ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने स्पर्धा घेतली जाते. कोरोना या संकटावर मात करून या स्पर्धेला खंड पडू न देता ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या, सतत 24 वर्षे कांकरिया करंडकने बालरंगभुमीची सेवा केली आहे. ही बालरंगभुमी ही एकंदरीतच नाट्यचळवळीचा पाया आहे. हा पाया समृध्द करण्याचे काम कांकरिया करंडकाने केले आहे. कांकरिया करंडकाच्या रंगमंचावरून गेलेले अनेक कलाकार आज चित्रपट तसेच मालिकांमध्ये गाजत आहेत. बालमन नाजूक, कोमल, निरागस असते त्याला जसे आपण पैलू पाडू तसे ते घडत जाते. बालनाटय चळवळीचे संस्कार त्यांच्या वयक्तिक जीवनालाही समृध्द व संपन्न करीत असतात.

सदाशिव मोहिते यांनी आभार मानले. सुत्रसंचलन दत्ता इंगळे यांनी केले. शनिवारी सायंकाळी या स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com