कॉलेजच्या युवकाला दांडक्याने मारहाण

कॉलेजच्या युवकाला दांडक्याने मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कॉलेजचे स्नेहसंमेलन संपल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. राहुल दत्तू आल्हाट (वय 19 रा. निंबळक ता. नगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. 11 जानेवारी रोजी रात्री सात वाजता निंबळक शिवारातील रेल्वे गेटवर ही घटना घडली.

जखमी राहुल आल्हाट यांनी 14 जानेवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कुणाल शिंदे, आदेश मदने, जैतुन मिरपगार, सनी जाधव व त्यांचे इतर साथीदार (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. इसळक ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. राहुल आल्हाट हा युवक त्यांच्या रामराव चव्हाण महाविद्यालय, नागापूर येथील स्नेहसंमेलन संपल्यानंतर घरी निंबळक येथे जात असताना निंबळक रेल्वे गेटजवळ थांबला होता.

त्यावेळी तेथे शुभम पाडळे व अथर्व जाधव यांच्यात वाद चालू होते. हा वाद राहुल पाहत असताना तेथे आलेल्या कुणाल व आदेश यांनी राहुल यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. जैतुन व सनी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राहुलची दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार साबीर शेख करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com