शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करुन द्या

जिल्हाधिकारी डॉ. भोसले : जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक
शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करुन द्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खरीप हंगामात (Kharip Season) शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी (Nationalized Banks) त्यांना वेळेवर कर्जपुरवठा (Loan supply) करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले (Collector Bhosale) यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात (Collector Office planning committee) नुकतीच जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (ZP CEO Rajendra Kshirsagar), जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक संदीप वालावलकर, नाबार्डचे जिल्हा उपमहाव्यवस्थापक शीलकुमार जगताप, आरसेटीचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रत्येक बँकांनी आतापर्यंत वाटप केलेल्या पीककर्जाचा आढावा घेतला. जिल्हा सहकारी बँक वगळता राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण (Nationalized Banks Crop Loan Disbursement) अतिशय अल्प आहे. वास्तविक या बँकांनी शेतकर्‍यांना खरीप पीक कर्जासाठी (Kharif crop loan) वेळेत मंजूरी देणे आवश्यक आहे. खरीप हंगाम सुरु झाला आहे. अशावेळी वेळेवर कर्ज मिळाले नाही, तर शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्ह्याच शेती हा मुख्य उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे बँकांनी शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करुन द्यावे.

प्रत्येक बँकांना उद्दिष्ट्य ठरवून देण्यात आले आहे. असे असतानाही राष्ट्रीयकृत बँकांची कामगिरी समाधारकारक नाही. येत्या 15 दिवसात ही कामगिरी सुधारावी आणि कर्ज वितरणाचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका (District Nationalized Banks) आणि खासगी बँकांनी (Private Bank) त्यांच्याकडील ठेवी आणि कर्ज वितरणाचे प्रमाण चांगले राहील, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनीही, जिल्ह्यात स्वयंसहायता बचत गटाने कर्ज प्रकरणासाठी दिलेले अर्ज ज्या बँकांकडे प्रलंबित आहेत, त्यांनी ते तात्काळ मार्गी लावावेत, अशी सूचना केली. या बैठकीस विविध बँकांचे जिल्हा व्यवस्थापक, प्रतिनिधी तसेच राज्य शासनाच्या विविध महामंडळांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

ज्या बँकांनी स्वयंसहायता गटांना कर्ज देण्यात चांगली कामगिरी बजावली आहे, त्यांचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांच्या हस्ते महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यात चांगली भूमिका बजावणार्‍या आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इंडियन ओवरसीज बँकेच्या प्रतिनिधींचा सत्कार केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com