file photo
file photo
सार्वमत

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग

संगमनेरात एका लॉन्ससह हॉटेल सील

Arvind Arkhade

संगमनेर|शहर प्रतिनिधी| Sangmner

करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी लागू केलेल्या आदेशाचा भंग करत सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता बेकायदेशीर जेवणाच्या पंगती बसवल्याने शहरातील कृष्णा लॉन्स या मंगल कार्यालयासह हॉटेल सेलिब्रेशनला प्रशासनाने काल सील ठोकले.

करोनाचा प्रसार होवू नये यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मंगल कार्यालयात मोजक्या लोकांची उपस्थिती व इतर अनेक बंधने घातली आहेत. विवाह सोहळ्यासाठीही अनेक बंधने आहेत. जिल्हाधिकार्‍यांचा आदेश असतानाही या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत आहे. अनेक विवाहसमारंभास शेकडो लोकांची उपस्थिती असते.

शहरातील हॉटेल सेलिब्रेशन व कृष्णा लॉन्स येथे काल विवाह सोहळे सुरू होते. या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे समजताच संगमनेर नगरपालिका व महसूलच्या पथकाने दोन्ही ठिकाणी कारवाई केली. या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग न पाळता जेवणावळी सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाने मंगल कार्यालय व हॉटेल चालकाविरुद्ध कायदेशिर कारवाई करत मंगल कार्यालय व हॉटेल सील केले आहे.

दरम्यान शहरातील मोठ्या क्लब मध्येही असा विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. याठिकाणीही जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनास मिळाली. त्यानंतर प्रशासनाने सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी पथक पाठविले. मात्र दुपारी उशिरापर्यंत या ठिकाणी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती मिळाली. मोठ्या क्लबवर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने हा दुजाभाव होत असल्याचा आरोप अनेक मंगल कार्यालय चालकांकडून होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com