जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या रिपाइंचे उपोषण - थोरात

श्रीरामपूर येथे डॉ.आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या रिपाइंचे उपोषण - थोरात

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशनजवळील स्मारक येथे लवकरात लवकर बसविण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण सोमवारी दि.29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सर्व आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांनी व रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय जिल्हा प्रमुख भिमा बागुल यांनी केले आहे.

पुतळा उभारण्यात यावा यासाठी श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना वेळोवेळी निवेदने देऊन मोर्चा काढूनही त्यांनी आजी-माजी सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली येऊन आजपर्यंत आंबेडकरी समाजाला झुलवत ठेवून दिशाभूल केली आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या मनात नाराजी पसरली आहे. नुकताच नगरपरिषदेवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या असूनसुद्धा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात काय अडचणी येत आहेत? असा सवाल समाज बांधव करीत आहेत. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.

या आमरण उपोषणासाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव विजय वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, दीपक गायकवाड, अजय साळवे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरा विभागीय जिल्हाध्यक्ष भिमा बागुल, शशिकांत पाटील, किरण दाभाडे, पप्पू बनसोडे, अमित काळे, नाना पाटोळे, बंटी भिंगारदिवे, विवेक भिंगारदिवे, बाबा राजगुरू, संजय भैलुमे, राजू जगताप, राजू उबाळे, विजय भांबळ, नगरसेवक राहुल कांबळे, दया गजभिये, मंगेश मोकळ, सुनील शिरसाठ, आशिष शेळके, सुशील धाईजे, रमेश गायकवाड, जितेंद्र रणशूर, राजेंद्र गवांदे, सतीश साळवे, अमित जाधव, विशाल कांबळे, रवींद्र दामोधरे, कुमार भिंगारे, माऊली भागवत, दासू पठारे, गंगा गायकवाड, गणेश ओहळ, सागर संसारे, विजय पवार, मोहन आव्हाड, मनोज काळे, राजू मगर, सुधीर काळोखे, बाळासाहेब विघे, सुहास राठोड, जॉन नन्नवरे, आबासाहेब रन्नवरे, सागर अमोलिक, रमेश अमोलिक, विशाल सुरडकर, राजूनाना गायकवाड, सागर भोसले, पंकज भालेराव, अ‍ॅन्थोनी शेळके, संजय गिरी, जानमोहमद शेख, अयुब पठाण यांच्यासह महिला आघाडीच्या भगिनी, जिल्हा पदाधिकारी, युवक आघाडी, मातंग आघाडी, मुस्लिम आघाडी, वडार समाज आघाडी, गोसावी समाज आघाडी, मराठा आघाडी, सोशल मीडिया सेल आदींसह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उत्तर व दक्षिण जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com