जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला घोडेगांव तालुक्याचा आराखडा

जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला घोडेगांव तालुक्याचा आराखडा

नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

जिल्हाधिकारी यांनी घोडेगांव तालुक्याचा संपूर्ण आराखडा तहसीलदार नेवासा यांचेकडून मागीतला आसल्याची माहीती फुले-शाहू-आबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर नाथा वैरागर यांनी दिली.

या संदर्भात आधीक माहिती देताना सुधीर वैरागर यांनी सांगितले की,घोडेगांव तालुक्याची ठराव प्रक्रिया यशस्वी झाल्याने जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी क्र.मह/ कार्या/ जमिन/ 1ब/1615/2020 दि.22,12,2020. या पत्रानुसार घोडेगांव तालुक्यात प्रस्तावीत असलेल्या अनुक्रमे घोडेगांव, चांदा, सोनई, वडाळा या चार मंडळातील 53 गावाचे गावनिहाय खातेदार,जमिन महसुल व तालुक्या अंतर्गत येणार्‍या गावनिहाय क्षेत्राचा तपशील तसेच घोडेगांव तालुका सर्व सोयी सुविधासह कार्यान्वीत करणेसाठी आवश्यक असलेली शासकीय कार्यालये, निवासस्थाने, घोडेगांव तालुक्यासाठी निर्माण करावयाची एकुण पदे, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे पगार, वहाने यांचा खर्च किती याचा संपुर्ण आराखडा जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी तहसीलदार नेवासा यांना मागीतला आहे.

घोडेगांवचा नावलौकिक नाथामास्तर घोडेगांवकर यांनी महाराष्ट्रात वाढविला असुन घोडेगांव तालुका निर्मितीने घोडेगांवच्या वैभवात भर पडणार असल्याचे सुधीर वैरागर यांनी सांगितले आहे.

घोडेगांव तालुक्याच्या निर्मितीने सर्व सामान्य जनतेचा श्रम, पैसा,वेळ वाचणार असुन मोठ्या प्रमाणातील रोजगार निर्मितीने सुशिक्षित बेरोजगारांचा रोजी रोटीचा प्रश्न सुटणार असंल्याचे ही श्री. वैरागर यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com