परिस्थिती पाहूनच मंदिरे उघडणार अन् नवरात्रौत्सव

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती
परिस्थिती पाहूनच मंदिरे उघडणार अन् नवरात्रौत्सव

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmedngar

राज्य शासनाने 7 ऑक्टोबरपासून मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, संबंधित गावात करोनाची काय परिस्थिती आहे, हे पाहूनच तिथे मंदिर उघडण्याबाबत परवानगी दिली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवीची मंदिरे असलेल्या ठिकाणी नवरात्रौत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे, याकडे पत्रकारांनी डॉ. भोसले यांचे लक्ष वेधले असता जिल्हाधिकारी म्हणाले, संबंधित देवस्थानांनी मंदिर परिसरात करोनाला प्रतिबंध करणार्‍या कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबतचे अंडरटेकिंग संबंधीत मंदिर प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला सादर करायचे आहे.

हे पाहूनच आणि मंदिर प्रशासनाची कोविडची तयारी पाहूनच त्यांना नवरात्रौत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाईल. गर्दी कितीही असली आणि नियमांचे पालन होत असेल तर त्याला जिल्हा प्रशासनाची हरकत नाही. मात्र, तसे प्रत्यक्षात होणे गरजेचे आहे. देवस्थान दर तासाला किती लोकांना कसे दर्शन देणार, नियमांचे काय पालन होणार, याबाबत कळवायचे आहे. मोहटा देवी संस्थानने उत्सव साजरा करण्याबाबत परवानगी मागितली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.