शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करावीत

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. भोसले
जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षकांना न्यायदानाच्या कामासोबतच शासनाने नेमून दिलेली अवांतर कामे सुध्दा करावी लागतात. अशी कामे करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करावीत. अडचणी प्रत्येक विभागात असतात. त्यातून मार्ग काढून काम करत रहावे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, डॉ. संजय कळमकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. भोसले म्हणाले, शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करतात. ते उद्याचा उत्तम नागरिक घडविण्याचे काम करीत असतात.

पूर्वीची गुरुकुल शिक्षणपद्धती कशी महत्त्वाची होती. याबाबत त्यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. भोसले यांनी शिक्षकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावर्षी जिल्ह्यातील एकूण 16 जिल्हा परिषद शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून प्राथमिक शाळेतील 14 आदर्श शिक्षकांचा आणि माध्यमिक शाळेतील 2 आदर्श शिक्षक यांचा यावेळी डॉ.भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्त सर्व शिक्षकांचे जिल्हाधिकार्‍यांनी अभिनंदन करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com