जिल्हाधिकार्‍यांचा पदभार 12 दिवसांसाठी सीईओंकडे

जिल्हाधिकार्‍यांचा पदभार 12 दिवसांसाठी सीईओंकडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे 27 जून ते 8 जुलै या काळात सुट्टीवर आहेत. त्यांच्या 12 दिवसांच्या सुट्टीच्या काळात जिल्हाधिकारी पदाचा पदभार हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले कुटुंबासोबत 12 दिवसांसाठी खासगी विदेश दौर्‍यावर जाणार आहेत. यासाठी त्यांनी विभागीय महसूल आयुक्त यांच्या मार्फत राज्य सरकारकडे सुट्टीची परवानगी मागितली होती. विभागीय महसूल आयुक्त राधाकिसन गमे यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या सुट्टीसाठी राज्य सरकार पातळीवर शिफारस केली होती. त्यांच्या सुटीच्या काळात जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आणि थेट आयएएस असणारे अधिकारी आशिष येरेकर यांच्यावर सोपवला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com