
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर महावितरणच्या कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत जमावबंदीचा आदेश असतानाही बेकायदेशीरपणे जमाव जमवून शाखा उद्घाटन करत फलकाचे अनावरण केले. तसेच बेकायदेशीरपण रस्त्यात खोदाई करून अतिक्रमण केलेले आहे. महावितरण कार्यालयाच्या आवारात गर्दी जमवून फटाक्यांची आतषबाजी करत अनधिकृतपणे घोषणाबाजी करत शांततेचा भंग केला असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
ही तक्रार महावितरण कंपनीच्या कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रघुनाथ लाड, सतीश भुजबळ, बाळू जावळे, बाळासाहेब पवार, सतीश शेळके, नितीन दुधाळ, आशिष वेलापुरे, विजय धवन, रावसाहेब राहिंज, नंदकुमार मेहेत्रे, सुभाष लोखंडे, निवृत्ती ओहोळ, सोमनाथ स्वामी, अशोक आव्हाड, कैलास अभंग, इब्राहिम हवालदार, शरद काकडे, सुकेश साखरे, नवनाथ लोंढे, बाबासाहेब वाकडे, चंद्रकांत सुरवसे, श्रीराम वाकचौरे, सचिन चोरगे, अर्जुन झनान, विलास बारवकर यांच्या विरोधात आहे.
या सर्वांनी एकत्र येत इतरांनाही भडकावत बेकायदेशीरपणे जमून 125 ते 150 लोकांचा मोठा जमाव जमून मोठमोठ्याने शासकीय कार्यालयाच्या आवारात घोषणा दिल्या. तसेच रस्ता अडवून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करत रहदारीस अडथळा निर्माण केला. याची खातेनिहाय चौकशी करून तांत्रिक कामगार युनियन 5059 या संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे सैनिक समाज पार्टीचे रावसाहेब काळे यांनी केली आहे.