जिल्ह्यातील शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय तीन दिवसांत

जिल्हाधिकारी डॉ. भोसले : लग्न समारंभावर पोलिसांची नजर
जिल्ह्यातील शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय तीन दिवसांत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्न समारंभाला होणारी गर्दी, रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेल यामुळे जिल्ह्यात करोना रूग्ण वाढत आहेत.

यावर निर्बंध आणण्यासाठी कडक उपाय योजना करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. जिल्ह्यातील शाळा सुरू ठेवायच्या का नाही यासाठी जिल्हा शल्यचिकिल्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून त्याबाबत तीन दिवसामध्ये निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

वाढत्या करोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला.

लग्न समारंभाला मोठ्याप्रमाण गर्दी होत आहे. लग्न समारंभाला 50 पेक्षा जास्त उपस्थितीवर बंधणे लादली आहे. तरीही लग्नांना गर्दी होत आहे. आता 14 मार्चपर्यंत होणार्‍या लग्नांवर पोलिसांचे नियंत्रण असणार आहे. लग्न समारंभाचे व्हिडीओ शुटिंग केली जाईल.

यामुळे लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास त्यावर कारवाई केली जाईल. त्याबरोबर हॉटेलमध्ये मोठ्याप्रमाण गर्दी होत आहे. त्याठिकाणी आचानक धाडी घालणार आहे. हॉटेलमध्ये 50 टक्क्यापेक्षा उपस्थिती असल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com