जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट
जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती भोसले यांनी स्वतःच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकून दिली आहे.

‘कोणीतरी माझे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आहे. याबाबत मी आवश्यक ती कार्यवाही करीत आहे. तरी नवीन अकाउंट वरून येणार्‍या फ्रेंड रिक्वेस्ट कोणीही स्वीकारू नये’, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे. तसेच संबंधित अकाउंट वरून काही संदेश आला तर त्याची माहिती द्या, असे सांगतानाच संबंधित बनावट अकाउंटची लिंक सुद्धा आपल्या पोस्टमध्ये डॉ. भोसले यांनी टाकली आहे.

दरम्यान, यापूर्वीही जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे नागरिकांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्याद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार घडले आहेत. आता थेट जिल्हाधिकार्‍यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com