थंडी वाढल्याने शेतकर्‍यांची चिंता दूर

गहू-हरभर्‍यासह अन्य पिकांच्या वाढीसाठी थंडी पोषक
थंडी वाढल्याने शेतकर्‍यांची चिंता दूर

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील (Newasa Pachegav) पाचेगावमध्ये (Pachegav) दोन ते तीन दिवसापासून थंडी वाढली (Cold increased) असून शेतकर्‍यांना (Farmer) या थंडीचा मोठा फायदा होणार आहे.

तब्बल दोन महिना थंडी गायब (cold weather) झाल्याने या भागातील शेतकरी चिंतेत (Farmers Worried) होते. थंडी अभावी शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामातील (Rabbi Season) गहू (Wheat), हरभरा (Gram), भुईमूग (Groundnut) व कांदा पिकांच्या (Onion Crops) पेरण्यांना व लागवडीना विलंब झाला होता.अतिथंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी (Rabbi Season Crops) पोषक असून पिके जोमात येतात व रोगाचा प्रादुर्भाव देखील या थंडीत कमी जाणवतो, त्यामुळे थंडी ही पिकासाठी पोषकच आहे.

थंडी गायब होवून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाळ कांदा रोपे, हरभरा, मका, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी कांदा इत्यादी पिके धोक्यात येऊन पिके बाधित होण्याचे प्रमाण अधिक वाढले होते. पिके वाचविण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधांच्या फवारण्या करून प्रयत्नांची परकाष्ठा करत होते.

पण आता सुटलेल्या थंडीमुळे या भागातील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठी मदत होईल अशी अपेक्षा या परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहे. थंडीने तात्पुरती का होईना रब्बी हंगामातील उभ्या पिकांच्या वाढीची चिंता दूर झाली आहे.

थंडीचे उशीरा आगमन झाल्यामुळे रब्बी हंगामातील लागवडी उशीरा झाल्या. परिणामी उत्पादनात काहीअंशी घट येणार असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com