
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पारनेर (Parner) येथील व्यापार्याची फसवणुक (Fraud of the Merchant) करणार्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (LCB Police) अटक (Arrested) केली. ऋषीकेश कैलास वंजारी (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) असे अटक (Arrested) केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तो सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात (Shevgav Police Station) एक गुन्हा दाखल आहे.
3 एप्रिल रोजी वैभव प्रदीप औटी (वय 23 रा. कोर्ट गल्ली, पारनेर) यांना अनोळखी इसमाने फोन करून महावीर सुपर शॉपी टाकळी ढोकेश्वर येथे कोल्ड्रींक्सची ऑर्डर (Cold Drinks) दिली. तसेच पुन्हा फोन करून कोल्ड्रींक्सचे बॉक्स गोडावुनमध्ये ठेवायचे आहे, असे म्हणुन औटी यांना रस्त्यात थांबवुन एका पिकअप मधील दोन अनोळखी इसमांना विविध प्रकारचे कोल्ड्रींक्सचे बॉक्स देण्यास सांगितले. औटी हे टाकळी ढोकेश्वर (Takali Dhokeshwar) येथील महावीर सुपर शॉपी येथे उर्वरीत कोल्ड्रींगचे बॉक्स देण्यास गेले असता संबंधीत दुकानदाराने कोणत्याही प्रकारची ऑर्डर दिली नसल्याचे सांगितल्याने त्यांनी पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) फिर्याद दिली होती. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, विजय वेठेकर, शरद बुधवंत, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, अर्जुन बडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे सदरचा गुन्हा ऋषीकेश वंजारी याने केला असून तो त्याच्या गावी गदेवाडी येथे मिळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. अधिक तपास पारनेर पोलीस करीत आहेत.