कोईमतूर ऊस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे

विवेक कोल्हे
विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक विवेक बिपीन कोल्हे यांची देशपातळीवर काम करणार्‍या कोईमतूर येथील उस संशोधन आणि विकास सोसायटीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

भारतातील उस संशोधन व विकासाला चालना देण्यासाठी आयसीएआर शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्यूट कोईमतुरच्या शास्त्रज्ञांनी या सोसायटीची स्थापना केली असून त्याचे देशभरात 251 सदस्य आहेत. त्यात अध्यक्ष म्हणून आयसीएआरच्या संचालक डॉ. हेमाप्रभा तर उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची निवड झाल्याची माहिती सरचिटणीस डॉ. आर. करुप्पैयन यांनी दिली. विवेक कोल्हे सध्या सहकारी साखर कारखानदारीत भारतात सर्वप्रथम सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यात पॅरासिटामॉल हा औषधी प्रकल्प साकारत असून त्याची उभारणी ते करत आहे.

विवेक कोल्हे हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात गेल्या पाच वर्षापासून तज्ज्ञ संचालक म्हणून काम करत आहेत. ते उच्चविद्याविभूषित आहेत, शेतकर्‍यांचे हेक्टरी उस उत्पादन वाढवुन, चांगला साखर उतारा देणार्‍या उस लागवड व बेणे यावर केलेल्या अथक व यशस्वी प्रयत्नातूनच त्यांची देशपातळीवरील संस्थेत उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. देशपातळीवर सध्या उसाचे हेक्टरी उत्पादन वाढवणे, कमी पाण्यात, कमी खर्चात शेतकर्‍यांना अधिक उत्पादन कसे मिळेल आदी घटकांचा अभ्यास कोईमतूर येथील ही उस संशोधन सोसायटी करत असून या संस्थेच्या उपाध्यक्षपदावर विवेक कोल्हे यांची निवड सार्थ ठरणार आहे.

त्यांच्या निवडीब्द्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) शुगर टेक्नॉलॉजी प्रमुख डॉ. आर. व्ही. दाणी, भाजपाचे युवा आमदार राम सातपुते (माळशिरस), भारतीय शुगर पुणेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार आदींनी अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com