भरडधान्य खरेदीसाठी 7 केंद्रे सुरू

21 ऑक्टोंबरपर्यंत शेतकर्‍यांना नोंदणी अर्ज भरण्यास मुदतवाढ
भरडधान्य खरेदीसाठी 7 केंद्रे सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खरीप हंगामामधील भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात 7 केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मका 1 हजार 962 रूपये व बाजरी 2 हजार 350 रूपये प्रति क्विंटल हमीभाव शासनाने निश्चित केलेला आहे. शेतकर्‍यांनी 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशनचे जिल्हा विपणन अधिकारी श्रीकांत आभाळे यांनी दिली.

तुळजा युमेन्स स्टेट लेव्हल को-ऑप सोसायटी (श्रीरामपूर), श्रीराम बि-बियाणे उत्पादन व पणन प्रक्रिया सहकारी संस्था (साकत ता. नगर), कृषी उत्पन्न बाजार समिती (कोपरगाव), जय भगवान स्वयंरोजगार सह संस्था (पाथर्डी), कर्जतकर फार्मर प्रोड्युसर कंपनी (कर्जत), सुखायु अँग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी (शेवगाव) आणि राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ (राहुरी) ह्या संस्थांना भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणी व खरेदी केंद्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे.

शेतमाल विक्री करावयाच्या शेतकर्‍यांनी नोंदणी करता फोटो काढण्यासाठी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी चालू हंगामातील ऑनलाईन पीक पेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड प्रत, बँक खाते पासबुक प्रत, रद्द केलेला धनादेश प्रत, सध्याचा मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे नोंदणी केंद्रावर सादर करावीत. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असेही आभाळे यांनी कळवले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com