सहकार मंत्री पाटील यांची पाथर्डीला अचानक भेट

कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांशी साधला संवाद
सहकार मंत्री पाटील यांची पाथर्डीला अचानक भेट

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रविवारी अचानक पाथर्डीला भेट देऊन शहरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासोबत स्थानिक पक्षीय व तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

मंत्री पाटील यांचे काँग्रेस पदाधिकार्‍यांनी शासकीय विश्रामगृह येथे स्वागत करुन सत्कार केला.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष नासीर शेख,तालुका उपाध्यक्ष रवी पालवे,किशोर डांगे,नवाब शेख,आनंद सानप, गणेश दिनकर,सुभाष भाबड,ज्ञानेश्वर भाबड,अनिल साबळे,दत्ता पाठक, महेश दौंड,महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण वाघमारे आदी उपस्थित होते.

पाटील यांनी तालुक्यातील विविध प्रश्नावर चर्चा केली. तालुक्यातील अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न आहे.शिल्लक उसाला अनुदान मिळावे.शेतीपुरक सहकारी उद्योग व्यवसायासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन व मदत मिळावी.सहकारी सोसायट्या मधुन शेतकर्‍यांना बिगरव्याजी कर्ज मिळावे अथवा व्याजाचे अनुदान मिळावे.कृत्रिम खत तुटवडा, बनावट व निकृष्ट दर्जाचे बियाणे यावर सरकारने अंकुश ठेवावा. अशा विविध मागण्या मंत्री पाटील यांच्या समोर मांडल्या.

यासर्व मागण्यांचा सरकार सकारात्मक विचार करून निर्णय घेवु. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न राज्यभरात आहे. यामधून मार्ग काढु असा विश्वास दिला.यावेळी कोल्हापूर येथील महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्याबद्दल पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

Related Stories

No stories found.